Headlines

Dipika Kakar : कॅन्सर होताच अभिनेत्री दीपिकाचं बदललं आयुष्य, आता जगतेय असं जीवन की…वाचून धक्काच बसेल!

या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध मालिकांत काम केलेले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखोंनी चाहते आहेत. कर्करोग झाल्यानंतर मात्र तिचे आयुष्य खूपच खडतर झाले आहे.

दीपिका कक्कर या अभिनेत्रीला आज देशभरात ओळखले जाते. तिचे सोशल मीडियावर लाखोंनी चाहते आहेत. छोट्या पडद्यावर अनेक मालिकांत तिने काम केलेले आहे. परंतु आता मालिकांत काम करण्यापासून ब्रेक घेतल्यानंतर तिने स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरू केलेले आहे.

तिने आपल्या ब्लॉगमध्ये झालेला कर्करोग यापासून ते सिस्टची सर्जरी इथपर्यंत तिने सर्व माहिती सांगितलेली आहे. तिने कर्करोगाशी झुंज देताना काय काय अडचणी आल्या याबाबतही सांगितलेले आहे. कर्करोगाला हरवल्यानंतर दीपिका खूपच आनंदी जगत आहे, असे तिच्या चाहत्यांना वाटते.

परंतु अजूनही तिला काही आरोग्यविषयक समस्या आहेत. दीपिकाचा पती शोएबच्या म्हणण्यानुसार शिस्ट सर्जरी झाल्यानंतर दीपिकाच्या दिनचर्येत मोठा बदल झाला आहे. दीपिकाला स्वयंपाकाची खूप आवड आहे.

तिला स्वयंपाक चांगला करता येतो. परंतु कर्करोगाशी झुंज देताना तसेच शिस्ट काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया झाल्याने तिला गेल्या वर्षभरापासून स्वयंपाक करता आलेला नाही. परंतु आता तिने पुन्हा एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली आहे.

तिने 10 वर्ष छोट्या पडद्यावर काम केलेले आहे. ससुराल सिमर का नावाची मालिकी तिची खूपच प्रसिद्ध झाली. तिने आतापर्यंत 12 पेक्षा जास्त मालिकांत काम केलेले आहे. आता मात्र ती यूट्यूबर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *