Headlines

Tata Punch EV Facelift: टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टची प्रचंड चर्चा, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत? जाणून घ्या…

Tata Punch EV Facelift Variant-Wise Price List: टाटा मोटर्सने भारतात पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्ज लॉन्च करून धुमाकूळ उडवून दिला आहे. या नव्या मॉडेलमध्ये आकर्षक डिझाइन, दोन बॅटरी पर्याय आणि अनेक कलर ऑप्शन्सचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अनेक अडव्हान्स फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या गाडीची किंमत अगदी परवडणारी आहे.

Tata Punch EV Facelift Variant-Wise Price List: भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत स्पर्धा झपाट्याने वाढत असताना टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. नवीन पंच ईव्ही फेसलिफ्ट (Punch EV Facelift) आधीपेत्रा जास्त आकर्षक डिझाइन, अपडेटेड फीचर्स आणि दोन बॅटरी पर्यायांसह लॉन्च करण्यात आली आहे. ही ईव्ही लॉन्च होताच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. आधुनिक फीचर्स, डिझाईन आणि कलर ऑप्शन्समुळे ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी कंपनीची अपेक्षा आहे.

पंच ईव्ही फेसलिफ्टची प्रचंड चर्चा

नवीन पंच ईव्ही फेसलिफ्टच्या किमतीची प्रचंड चर्चा सुरू आहे. टाटाने अतिशय परडवणाऱ्या किमतीत ही एसयूव्ही लॉन्च करून मार्केटमध्ये धुमाकूळ उडवून दिला आहे. नवीन पंच ईव्ही फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 9.69 लाख रुपये (एक्स शोरुम-मुंबई) ठेवण्यात आली आहे. तसेच या मॉडेलमध्ये ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ पर्याय फक्त 6.49 रुपयांपासून उपलब्ध आहे. BaaS योजनेअंतर्गत बॅटरी सबस्क्रिप्शनचा खर्च 2.6 प्रति किलोमीटर इतका आहे.

पंच ईव्ही फेसलिफ्टची किंमत?

30 kWh बॅटरीसह स्मार्ट व्हेरिएंटची किंमत 9.69 लाख रुपये आहे, तर स्मार्ट प्लस व्हेरिएंट 30 kWh साठी 10.29 लाख रुपये आणि 40 kWh साठी 10.89 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यासिवाय अॅडव्हेंचर व्हेरिएंट 40 kWh बॅटरीसह 11.59 लाख रुपयांना मिळते. एम्पॉवर्ड व्हेरिएंटची किंमत 12.29 लाख रुपये असून टॉप एन्ड एम्पॉवर्ड प्लस व्हेरिएंट 12.59 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

पंच ईव्ही फेसलिफ्टचे डिझाइन

पंच ईव्ही फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन फ्रंट बंपर आणि बंद ग्रिल डिझाइन देण्यात आले आहे. वाय-आकाराचे एलईडी डीआरएल्स कायम ठेवण्यात आले असले तरी हेडलॅम्प जोडणारा ब्लॅक ट्रिम काढून टाकण्यात आला आहे. १६-इंच एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स, तीन नवीन एक्स्टेरियर रंग पर्याय आणि कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक रूफ यामुळे गाडी अधिक स्टायलिश दिसते. मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स देण्यात आले आहेत. या ईव्हीची ग्राउंड क्लिअरन्स 195 मिमी असून पाण्यात चालण्याची (water-wading) क्षमता 450mm आहे.

बॅटरी, रेंज आणि चार्जिंग टाईम

पंच ईव्ही फेसलिफ्ट (Punch EV Facelift) दोन बॅटरी पर्यायांसह येते. यात 30kWh आणि 40kWh हे दोन पर्याय आहेत. 30kWh व्हर्जनची रिअल-वर्ल्ड सी-75 रेंज सुमारे 260 ते 275 कितीपर्यंत आहेस तर 40kWh बॅटरी 335 ते 355 किमीपर्यंत रेंज देते. 30kWh व्हेरिएंट 87.16 बीएचपी पॉवर आणि 153.8 एनएम टॉर्क जनरेट करतो, तर 40kWh व्हर्जन 127.39 बीएचपी आणि 153.8 एनएम टॉर्क देतो. फास्ट चार्जिंग सुविधेमुळे 20 ते 80 टक्के चार्जिंग सुमारे 26 मिनिटांत पूर्ण होते, तसेच 15 मिनिट चार्ज केल्यास ती 135 किमीपर्यंत रेंज देऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. 40kWh बॅटरीवर फर्स्ट ओनरसाठी लाईफटाईम उच्च-व्होल्टेज वॉरंटी (lifetime high-voltage warranty) देण्यात आली आहे. परंतु यासाठी नियम व इटी लागू आहेत.

पंच ईव्ही फेसलिप्टमधील फीचर्स

पंच ईव्ही फेसलिप्टच्या इंटेरियरमध्ये 10.25-इंच हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जर आणि ओटीए अपडेट्स यांसारखी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. 40kWh व्हेरिएंटमध्ये ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, ईएसपी, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि हिल होल्ड कंट्रोल यांसारखी महत्त्वाची इक्विपमेन्ट देण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *