Headlines

T20 World Cup WI vs SA : दुसरा सेमीफायनलिस्ट ठरणार, भारतासाठी कोणाचा विजय फायदेशीर?

india qualification scenario News : टी२० वर्ल्ड कप २०२६ सुपर फेरीमधील भारतीय संघाने पहिला सामना गमावल्याने मोठी झटका बसला. त्यामुळे सेमी फायनलला जाणयाची वाट बिकट झालीय. मात्र आज होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्या निकालावर पुढील समीकरणे होणार आहेत.

मुंबई : वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे लक्ष वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अहमदाबादला होणाऱ्या सामन्याकडे असेल. या सामन्यांत विंडीजने बाजी मारल्यास भारताचा मार्ग खडतर होणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर विंडीजचे धडाकेबाज फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज यांच्यातील चकमक लढतीचा निकाल निश्चित करू शकेल.

द. आफ्रिकेने भारतास ७६ धावांनी हरवून आपली ताकद दाखवली. विंडीजने झिम्बाब्वेचा १०७ धावांनी पराभव करून आव्हान निर्माण केले. चेंडू ताकदीने भिरकावून देण्याची क्षमता असलेले विंडीज फलंदाज समतोल दक्षिण आफ्रिका गोलंदाजीस कसे सामोरे जातात याकडे भारतीय संघव्यवस्थापनाचेही लक्ष असणार. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली आहे. द. आफ्रिकेने याच मैदानात भारतास सहज हरवले होते. मात्र ती लढत विद्युतझोतात होती. आजचा सामना प्रामुख्याने सूर्यप्रकाशात आहे.त्यामुळे दवाचे आव्हान नसेल, मात्र उष्णता परीक्षा बघणार. या मैदानातील जास्त अनुभवाचा गतउपविजेत्यांना फायदा होईल. मात्र विंडीजचा धोका ते जाणतात. हीच बाब सामन्यातील रंगत वाढवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *