ND vs ZIM T20 Playing 11 : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज सामना होणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ते दोन मोठे बदल कोणते असणार आहेत. त्यासोबतच कोणाची एन्ट्री होणार आणि कोणाचा पत्ता कट होणार जाणून घ्या.

मुंबई : वर्ल्ड कप 2026 सुपर 8 मधील भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज सामना पार पडणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता चेन्नई येथील मैदानावर होणार आहे. या सामन्यामध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आता कमबॅक करावे लागणार आहे. कारण आजच्या सामन्यात जर पराभव झाला तर वर्ल्ड कप मधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे. त्यामुळे भारतासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये दोन जे बदल होणार आहेत ते कोणते जाणून घ्या.
संजू सॅमनस याची संघात एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारताची फलंदाजी खराब झाली त्यामुळे आजच्या सामन्यात बदल होणार हे निश्चित आहे. अभिषेक शर्मा हा सलग तीन सामने शून्य आणि चौथ्या सामन्यात १५ धावा करून परतला. तिलक वर्मा याने धावा केल्या पण स्लो खेळल्यामुळे संघाला फटका बसत आहे. त्यामुळे आज तिलकचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. भारताच्या फलंदाजीच्या क्रमामध्ये बदल होऊ शकतो. जर संजू खेळला तर ओपनिंगला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन येतील आणि तीन नंबरला ईशान किशन अशीसुद्धा ओपनिंग असू शकते.
