Headlines

Bigg Boss Marathi 6 : घरातील वातावरण तापलं, विशाल-रुचिता वाद चर्चेत

Bigg Boss Marathi 6 Update : ‘बिग बॉस मराठी ६’च्या २५ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांच्यामध्ये वाद झाला आहे.

मुंबई – ‘ बिग बॉस मराठी ६ ‘च्या २५ फेब्रुवारी रोजीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस रेशन कार्डसाठी गणिताचा टास्क घेतात. मात्र, पहिल्या फेरीत स्पर्धकांची बाचाबाची होते, त्यामुळे पहिल्या फेरीत कोणीच जिंकत नाही. एका टीममध्ये अनुश्री, प्राजक्ता, विशाल, रुचिता, राकेश असतात. तर दुसऱ्या टीममध्ये सागर, तन्वी, राकेश, प्रभू, राखी दीपाली असतात. दुसऱ्या फेरीतही सदस्यांमध्ये भांडण होतं. त्यामुळे दोन्ही फेरी रद्द होतात. त्यामुळे दोन्ही टीमना ब्राँझ रेशन कार्ड मिळतं. तन्वी, उगाच आकांडतांडव करते.

दुसऱ्यादिवशी सकाळी विशाल रुचिताला सांगतो, ‘तन्वीला नाही काही बोलायचं, जे काही बोलायचं ते मला बोलायचं’ त्यावर रुचिता म्हणते, ‘जे मनात आहे ते ओठांवर येतं’ राखी आयुषचा विषय काढते. आयुष तुझा बॉयफ्रेंड होता, असं राखी तन्वीला म्हणते. त्यावर तन्वी म्हणते, ‘आम्ही फक्त चांगले मित्र होतो, मला बाहेर जाऊन लग्न करायचं. माझ्या घरचे बघत असतील’ तन्वी ओक्साबोक्शी रडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *