“दोन रुपये जास्त गेले तरी चालतील, पण क्वालिटी चांगली मिळेल,” या एका विश्वासावर आपण ‘हल्दीराम’ (Haldiram) किंवा इतर मोठ्या कंपन्यांची पाकिटं डोळे झाकून उचलतो. पण हाच तुमचा विश्वास आता धुळीला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : सण जवळ आला की आपल्या घराघरात आनंदाचं वातावरण असतं. पाहुणे येणार म्हणून घराची साफसफाई होते, नवीन कपड्यांची खरेदी होते आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘मिठाई’. आपल्याकडे पद्धतच आहे, कोणतंही शुभ कार्य असो किंवा सण, तोंड गोड केल्याशिवाय तो पूर्ण होत नाही. पण ही मिठाई खरेदी करताना आपण काय करतो? कोणाचं तरी पोट बिघडायला नको किंवा घरातील लहान मुलांना त्रास व्हायला नको म्हणून आपण गल्लीतल्या साध्या दुकानापेक्षा एखाद्या मोठ्या, नामांकित ब्रँडच्या शोरूममध्ये जातो.
“दोन रुपये जास्त गेले तरी चालतील, पण क्वालिटी चांगली मिळेल,” या एका विश्वासावर आपण ‘हल्दीराम’ (Haldiram) किंवा इतर मोठ्या कंपन्यांची पाकिटं डोळे झाकून उचलतो. पण हाच तुमचा विश्वास आता धुळीला मिळण्याची शक्यता आहे. कारण जे सत्य समोर आलं आहे, ते वाचून तुम्ही पुढच्या वेळी मिठाईचं पाकीट उचलताना शंभर वेळा विचार कराल.
लखनौमध्ये होळीच्या तोंडावर ‘अन्न सुरक्षा विभागाने’ (FSDA) एक विशेष मोहीम राबवली. सणासुदीत भेसळ रोखण्यासाठी अधिकारी फिरत असताना त्यांना एका मोठ्या गोदामाची माहिती मिळाली. जेव्हा अधिकारी फैजुल्लागंज येथील ‘हल्दीराम’च्या वेअरहाऊसवर (गोदामावर) पोहोचले, तेव्हा तिथे जे पाहायला मिळालं ते भयानक होतं.
