Headlines

लिव्हरमध्ये चरबी साचतेय? हृदय आणि किडनीवर वाढतो धोका – ओळखा 10 लक्षणे व 5 सोपे उपाय

फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि अल्कोहोलिक व नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमधील फरक काय? हा आजार कोणाला व का होतो? या आजाराची लक्षणे, संकेत, कारणे व फॅटी लिव्हर बरा करण्यासाठी सुरक्षित नैसर्गिक उपाय काय? डाएट व कोणत्या व्यायामाने लिव्हर हेल्दी राहते या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून जाणून घेऊया.

यकृत (Liver) हे आपल्या शरीरातील एक असं इंजिन आहे जे रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्यापासून ते पचनासाठी आवश्यक पित्त तयार करण्यापर्यंत ५०० हून अधिक कामे एकाच वेळी करत असते. मात्र, जेव्हा या लिव्हरच्या पेशींमध्ये अतिरिक्त चरबी साचू लागते तेव्हा त्याला ‘फॅटी लिव्हर’ असे म्हणतात. धक्कादायक सत्य तर हे आहे की, मद्यपान न करणाऱ्या लोकांमध्ये (NAFLD) याचे प्रमाण अधिक वेगाने वाढत आहे.

फॅटी लिव्हरचे रूपांतर गंभीर आजारात ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR) च्या अहवालानुसार, आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे यकृत अर्थात लिव्हरवर सूज येऊन ते हळूहळू निकामी होते. लिव्हरचे आजार शेवटपर्यंत वेदना किंवा कोणतीही लक्षणं दाखवत नाही, म्हणूनच लिव्हरच्या आजारांना ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. वेळीच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर फॅटी लिव्हरचे रूपांतर लिव्हर सोरासिस किंवा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचही होऊ शकतेय. त्यामुळे जर भविष्यात निरोगी आयुष्य जगायचं असेल तर लिव्हरवर साचलेल्या चरबीचा थर वेळीच कमी करणे आवश्यक आहे.

फॅटी लिव्हरचा इतर अवयवांवर काय परिणाम होतो?

फॅटी लिव्हरचा इतर अवयवांवर काय परिणाम होतो?

लिव्हरचे वजन ५% पेक्षा जास्त चरबीने वाढले की त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. पण हा आजार केवळ यकृतापुरता मर्यादित राहत नाही, फॅटी लिव्हरमुळे शरीरात ‘क्रॉनिक इन्फ्लेमेशन’ (कायमस्वरूपी सूज) निर्माण होते. याचा थेट परिणाम हृदयावर होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच, यकृताचा परिणाम किडनीवर (मूत्रपिंड) होऊन ‘क्रॉनिक किडनी डिसीज’चा धोका निर्माण होतो. जेव्हा यकृत साखरेवर प्रक्रिया करू शकत नाही, तेव्हा स्वादुपिंडावर (Pancreas) ताण येतो आणि टाईप 2 डायबिटीज होतो. म्हणजेच, खराब लिव्हर हे संपूर्ण शरीराच्या यंत्रणेला कोलमडवून टाकू शकते.

फॅटी लिव्हरची लक्षणे सुरुवातीला अत्यंत अस्पष्ट असतात जसे की

लिव्हरवर चरबी साचल्यामुळे हृदय व किडनीवर येतो ताण? दिसतात ही 10 लक्षणे, लिव्हर बरं करण्यासाठी वापरा हे 5 सोपे उपाय

Authored by: प्रतीक्षा सुनील मोरे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Medically Reviewed by: Dr Shubham Jain

Subscribehttps://navbharattimes.indiatimes.com/youtubesubscribe.cms?channelid=UCjD_oFXbVfCDhGEsHunI-hg

फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि अल्कोहोलिक व नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमधील फरक काय? हा आजार कोणाला व का होतो? या आजाराची लक्षणे, संकेत, कारणे व फॅटी लिव्हर बरा करण्यासाठी सुरक्षित नैसर्गिक उपाय काय? डाएट व कोणत्या व्यायामाने लिव्हर हेल्दी राहते या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून जाणून घेऊया.

फोटो सांकेतिक आहेत
फॅटी लिव्हर म्हणजे काय?

यकृत (Liver) हे आपल्या शरीरातील एक असं इंजिन आहे जे रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्यापासून ते पचनासाठी आवश्यक पित्त तयार करण्यापर्यंत ५०० हून अधिक कामे एकाच वेळी करत असते. मात्र, जेव्हा या लिव्हरच्या पेशींमध्ये अतिरिक्त चरबी साचू लागते तेव्हा त्याला ‘फॅटी लिव्हर’ असे म्हणतात. धक्कादायक सत्य तर हे आहे की, मद्यपान न करणाऱ्या लोकांमध्ये (NAFLD) याचे प्रमाण अधिक वेगाने वाढत आहे.

फॅटी लिव्हरचे रूपांतर गंभीर आजारात‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR)च्या अहवालानुसार, आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे यकृत अर्थात लिव्हरवर सूज येऊन ते हळूहळू निकामी होते. लिव्हरचे आजार शेवटपर्यंत वेदना किंवा कोणतीही लक्षणं दाखवत नाही, म्हणूनच लिव्हरच्या आजारांना ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. वेळीच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर फॅटी लिव्हरचे रूपांतर लिव्हर सोरासिस किंवा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचही होऊ शकतेय. त्यामुळे जर भविष्यात निरोगी आयुष्य जगायचं असेल तर लिव्हरवर साचलेल्या चरबीचा थर वेळीच कमी करणे आवश्यक आहे.

फॅटी लिव्हरचा इतर अवयवांवर काय परिणाम होतो?

सर्व फोटो सांकेतिक आहेतफॅटी लिव्हरचा इतर अवयवांवर काय परिणाम होतो?

लिव्हरचे वजन ५% पेक्षा जास्त चरबीने वाढले की त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. पण हा आजार केवळ यकृतापुरता मर्यादित राहत नाही, फॅटी लिव्हरमुळे शरीरात ‘क्रॉनिक इन्फ्लेमेशन’ (कायमस्वरूपी सूज) निर्माण होते. याचा थेट परिणाम हृदयावर होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच, यकृताचा परिणाम किडनीवर (मूत्रपिंड) होऊन ‘क्रॉनिक किडनी डिसीज’चा धोका निर्माण होतो. जेव्हा यकृत साखरेवर प्रक्रिया करू शकत नाही, तेव्हा स्वादुपिंडावर (Pancreas) ताण येतो आणि टाईप 2 डायबिटीज होतो. म्हणजेच, खराब लिव्हर हे संपूर्ण शरीराच्या यंत्रणेला कोलमडवून टाकू शकते.

फॅटी लिव्हरची लक्षणे सुरुवातीला अत्यंत अस्पष्ट असतात जसे की

  • सतत थकवा जाणवणे व पोटाभोवती चरबी साठणे
  • पोटात उजव्या बाजूला जडपणा जाणवणे व पोटात अस्वस्थता
  • अपचन, पोट फुगणे व डोळे आणि त्वचेवर पिवळसरपणा
  • मूत्र गडद पिवळे होणे व शौच फिकट रंगाचा होणे
  • भूक न लागणे व वजन कमी होणे
  • अशक्तपणा
  • नाकातून रक्तस्त्राव होणे
  • त्वचेवर खाज सुटणे
  • ओटीपोटात दुखणे
  • पाय दुखणे
  • शरीरात वेदना होणे
  • अचानक वजन वाढणे
  • लिव्हरवर सूज येणे​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *