केळ्यात व्हिटॅमिन सी, फायबर, मॅगनीज आणि व्हिटॅमिन बी-6 भरपूर असतं. शिवाय केळं फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुक्त मानलं जातं.
बाराबंकी : केळं हे बाजारात सहज मिळणारं फळ आहे, जे लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण आवडीने खातात. ते चवीला स्वादिष्ट असतं म्हणून आपण खातो, परंतु त्यात अनेक पौष्टिक गुणधर्मही असतात हे आपल्याला माहितीये का. केळ्यामुळे विविध आजारांवर मूळापासून आराम मिळतो. शिवाय या फळाच्या पानांना धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे.
केळ्यात व्हिटॅमिन सी, फायबर, मॅगनीज आणि व्हिटॅमिन बी-6 भरपूर असतं. शिवाय केळं फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुक्त मानलं जातं. महत्त्वाचं म्हणजे केळ्याला एनर्जीचं पॉव्हरहाऊस म्हणतात. तज्ज्ञ सांगतात की, केळं थंड असल्यामुळे ते खाल्ल्याने शरिरात गारवा निर्माण होतो आणि अशक्तपणा दूर होतो.
पेरू आवडीने खाता? त्याची पानंही खा! वजन होतं कमी, पुरुषांची वाढते ताकद
गाढ झोप येत नसेल, सारखी चिडचिड होत असेल, प्रचंड तहान लागत असेल, शरिरात जळजळ होत असेल, तर केळं खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीर छान ऊर्जावान राहतं. शिवाय शुगर, किडनी आणि पोटासंबंधित आजारांवर आराम मिळतो.
